MNS Candidate Fifth List Saam Tv
महाराष्ट्र

MNS Candidate Fifth List: पनवेलमधून योगेश चिले, बीडमधून कोणाला उमेदवारी? मनसेची ५ वी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा...

Maharashtra Assembly Election 2024: मनसेने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. जाणून घ्या कोणाला कुठून तिकीट देण्यात आलं आहे.

Satish Kengar

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये मनसेने पनवेल विधानसभा मतदारसंघातून योगेश चिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच बीडमधून मनसेने सोमेश्वर कदम यांना संधी दिली आहे. आपल्या पाचव्या यादीत मनसेने १५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यातच मनसेने कोणाला कुठून तिकीट दिलं आहे, हे जाणून घेऊ...

कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

१. १८८ पनवेल: योगश जनार्दन चिले

२. ६ खामगांव: शिवशंकर लगर

३. २५० अक्कलकोट: मल्लिनाथ पाटील

४. २४९ सोलापूर शहर मध्य: नागेश पासकंटी

५. २७ जळगाव जमोद: अमित देशमुख

६. २५ मेहकर: भय्यासाहेब पाटील

७. ९७ गंगाखेड: रुपेश देशमुख

८. ५१ उमरेड: शेखर ढुंडे

९. १०६ फुलंब्री: बाळासाहेब पाथ्रीकर

१०. २४३ परांडा: राजेंद्र गयाट

११. २४२ उस्मानाबाद (धाराशिव): देवदत्त मोरे

१२. ४८ काटोल: सागर दुधाने

१३. २३० बीड: सोमेश्वर कदम

१४. १९३ श्रीवर्धन: फैझल पोपेरे

१५. २७२ राधानगरी: युवराज येडुरे

याआधी जाहीर केलेल्या मनसेच्या दुसऱ्या यादीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मनसेने आपल्या दुसऱ्या यादीत एकूण ४५ उमेदवार जाहीर केले होते. तर तिसऱ्या यादीत मनसेने १३ उमेदवार जाहीर केले होते. तसेच चौथ्या यादीत ५ उमेदवार जाहीर केल्यानंतर पाचव्या यादीत १५ नावांची घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT