Malbar Hill Constituency 
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा होणार आमदार? पाहा Exit Poll

Malbar Hill Constituency: मलबार हिल मतदारसंघामध्ये मंगलप्रभात लोढा आणि भैरुलाल चौधरी यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये भाजपाचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. मलबार हिल मतदारसंघातून भाजपाचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी मंगलप्रभात लोढा यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. मंगलप्रभात लोढा याठिकाणी निवडून येऊ शकतात.

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत होती. निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. भाजपाच्या उमेदवाराचं या मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळालं. एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मलबार हिल विधानसभेचे संभाव्य आमदार हे भाजपाचे मंगलप्रभात लोढा असतील असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे भैरुलाल चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण भाजपाचे उमेदवार मंगलप्रभात लोढा हे आमदार होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मलबार हिल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक दरवेळीप्रमाणे यावेळेला देखील एकतर्फी होण्याती शक्यता आहे. यावेळी देखील भाजपाने मंगलप्रभात लोढा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर त्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने भैरुलाल चौधरी यांना उमेदवारी दिलेली आहे. मंगलप्रभात लोढा यांनी तब्बल पाच वेळेला संपूर्ण मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. मंगलप्रभात लोढा हे एक यशस्वी व्यावसायिक आहेत.

एवढेच नव्हे तर त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक पद देखील भूषवलेली आहेत. पाच वेळेला या संपूर्ण मतदारसंघाचं नेतृत्व केल्यामुळे मंगलप्रभात लोढा यांचं या मतदारसंघात काम देखील आहे. अलीकडच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये यांनी एनडीएच्या उमेदवाराला तब्बल ४८ हजार मतांचं लीड मिळवून दिलं होतं. तर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंगलप्रभात लोढा यांचं तब्बल ७२ हजारांनी विजय झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT