MVA Seat Sharing  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महाविकास आघाडीचं ठरलं! जागा वाटपावर तब्बल ९ तास खलबतं, आज काँग्रेसची दिल्लीत बैठक, उमेदवार फायनल होणार

MVA Seat Sharing Formula: विधानसभा निवडणुकांचे उमेदवार निश्चित करण्यासाठी आझ काँग्रेसची दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे. दिल्लीत काँग्रेसच्या आज दोन महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत.

Gangappa Pujari

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. शनिवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरु होते. रात्री उशिरापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर आज काँग्रेस उमेदवारांच्या अनेक नावांवर आज शिक्कामोर्तब झाली आहे.

काँग्रेसची दिल्लीत बैठक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा निवडणुकांचे उमेदवार निश्चित करण्यासाठी आज काँग्रेसची दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे. दिल्लीत काँग्रेसच्या आज दोन महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत. काँग्रेसच्या मागच्या बैठकीत 84 जागांवर चर्चा करून 62 जागांवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर बाकी असलेल्या जागांवर उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेस पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

उमेदवार फायनल होणार!

त्यानंतर आजच सायंकाळी 4 वाजता काँग्रेसच्या केंद्रीय निवडणुक समितीचीही (CEC) बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, मुकुल वासनिक यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते बैठकीला उपस्थित असणार आहेत. CEC च्या बैठकीत मतदार संघ निहाय उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असून आज रात्री उशिरा किंवा उद्या पहिली यादी येण्याची शक्यता आहे.

मुंबईत मविआची ९ तास खलबतं

दरम्यान, काल ट्रायमंड हॉटेलमध्ये सायंकाळी चार वाजल्यापासून जवळपास ९ तास महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जवळपास महाविकास आघाडीची जवळपास सर्व जागांवर चर्चा पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही जागांवरुन मविआमध्ये तिढा होता, याबाबत महत्वाची चर्चा झाली. त्यामुळे आज किंवा उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ५८ उमेदवार निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ५८ उमेदवारांमध्ये अद्याप अल्पसंख्यांक समुदायाचा एकही उमेदवार नाही. लोकसभेला अल्पसंख्यांक समुदायाने महाविकास आघाडीच्या पदरात भरभरून मतदान केल्याने अल्पसंख्यांक समुदायाला संधी मिळावी अशी शरद पवार पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाली. सध्या उमेदवार निश्चित झालेल्या ५८ विधानसभा मतदारसंघात अणुशक्ती नगर विधानसभेचा समावेश नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

SCROLL FOR NEXT