Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पुणे शहरातील नाराज नेत्यांच्या भेटीला; बंद दाराआड चर्चा

Maharashtra Assembly Election 2024 : नाराज नेत्यांची भेट घेत महायुतीला फटका बसू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट नाराज नेत्यांच्या घरी जाऊन बंद दाराआड चर्चा झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महायुतीमध्ये जागावाटपावरून अनेक नेते नाराज असल्याचं दिसत आहे. याचा फटका निवडणुकीत बसण्याची दाट चिन्हे आहेत. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नाराज नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. नाराज नेत्यांची भेट घेत महायुतीला फटका बसू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट नाराज नेत्यांच्या घरी जाऊन बंद दाराआड चर्चा झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे काल दुपारी पुणे विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर सुरुवातीला त्यांनी सनी निम्हण यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सनी निम्हण हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी भेटली नाही. त्यानंतर नाराज सनी निम्हण काँग्रेसकडून उमेदवारी भेटावी यासाठी देखील फिल्डिंग लावली होती.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संजय काकडे यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. संजय काकडे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु उमेदवारी न भेटल्याने लोकसभेच्या निवडणुकीपासून संजय काकडे नाराज होते. संजय काकडे यांनी मध्यंतरी शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या घरी जात धीरज घाटे यांची देखील भेट घेतली. धीरज घाटे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने यांना उमेदवारी भेटल्यानंतर ते नाराज होते.

धीरज घाटे यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस थेट राजेंद्र शेळीमकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. राजेंद्र शेळीमकर हे पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ यांना संधी देण्यात आल्यानंतर ते नाराज होते.

शिळीमकर यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस श्रीनाथ भिमाले यांची भेट घेण्यासाठी श्रीनाथ भिमाले यांच्या निवासस्थानी पोहोचले. पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने श्रीनाथ भिमाले देखील नाराज होते. श्रीनाथ भीमालेंशी देखील बंद दाराआड फडणवीसांनी चर्चा केली आहे.

नंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपला ताफा भरत वैरागे यांच्या निवासस्थानी वळवला. भरत वैरागे हे कँटोनमेंट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र संधी न मिळाल्याने ते देखील नाराज होते. देवेंद्र फडणीस यांनी शेवटी आपला ताफा थेट वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात जगदीश मुळीक यांच्या घरी वळवला आणि जगदीश मुळीक यांच्याशी देखील बंद दाराआड चर्चा केली. जगदीश मुळीक हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांना एबी फॉर्म देखील मिळाला होता.

जगदीश मुळीक आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले होते तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून अर्ज भरू नका असं जगदीश मुळीक यांना सांगितलं होतं. त्यानंतर आज थेट जगदीश मुळीक यांच्या निवासस्थानीत देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT