Maharashtra Assembly Election Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election: ब्रेकिंग! विधानसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदरच कॉंग्रेस लागली कामाला, इच्छुक उमेदवारांकडून अर्जामागे मागितला हजारोंचा पक्षनिधी

Rohini Gudaghe

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूरमधून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आलीय. काँग्रेस विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अॅक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. कारण आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इच्छुक उमेदवारांची अर्ज मागवले आहेत. नाना पटोलेंनी १० ऑगस्टपर्यंत इच्छुकांचे अर्ज मागवल्याची माहिती मिळत आहे.

कॉंग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू

राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये होत आहेत. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरुन या निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात (Maharashtra Assembly Election 2024) आलीय. उमेदवारी अर्जाचा नमुना देखील जाहिर करण्या आला आहे. यावेळी इच्छुक उमेदवारांसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. हे अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट आहे.

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी काय अटी आहेत?

सर्व साधारण वर्गासाठी इच्छुक उमेदवारांना २० हजार रुपये भरावे लागणार आहे. अनुसूचित जाती जमाती आणि महिलांसाठी १० हजार रुपयांचा पक्ष निधी द्यावा लागणार आहे. शिवाय अर्जासोबत हमीपत्र सुद्धा द्यावे (Maharashtra Assembly Election) लागतील. जेणेकरून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करणार नाही. गुन्हे दाखल असल्यास त्याचीही माहिती द्यायची आहे. यासह किती वर्षांपासून पक्षात सक्रिय आहे, कुटुंबाची पार्श्वभूमीवर, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग आहे का? याची देखील सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे.

रक्कम पक्षनिधी म्हणून रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीच्या नावाने डीडीद्वारे प्रदेश कार्यालय किंवा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा करायचा आहे. जे उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जमा होतील, ते उमेदवारी अर्ज पक्षनिधीसह प्रदेश कार्यालयाकडे ठरवून दिलेल्या तारखेअगोदर जमा करायचे (Nana Patole) आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात 'लाडक्या बहिणी' असुरक्षित, ७ महिन्यांत २६५ बलात्काराच्या घटना; आरोपींवर कारवाई कधी?

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींची मांदियाळी, भाऊंचं होतंय तोंडभरून कौतुक

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Marathi News Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

SCROLL FOR NEXT