Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: कसबा पोटनिवडणुकीवरुन अजित पवारांचा भाजपला इशारा, म्हणाले; 'निकाल येऊ द्या, मगं....

पुण्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला तर आहे तेही जाईल, असं अजितदादा म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Assembly Budget Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाचा आज दुसरा दिवस विरोधकांनी गाजवला. शेतकरी प्रश्न, कांदा-कापूस दर, छत्रपती शिवराय-बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तसेच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून महापुरुषांचा सातत्याने अवमान होत असल्याच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांची कानउघाडणी केली. त्याचबरोबर यावेळी अजित पवार यांनी कसबा पोट निवडणूकीवरुन जोरदार हल्लाबोल केला. (Maharashtra Politics)

काय म्हणाले अजित पवार....

आजच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधाऱ्यांना फक्त मतांसाठी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब हवेत. त्यांच्या स्मारकांचं भूमीपूजन करुन किती दिवस झाले? काय झालं त्यांच्या स्मारकांचं? सरकार का उत्तर देत नाही?" अशा प्रश्नांच्या फैरी अजित पवार यांनी झाडल्या.

त्याचबरोबर पुणे पोट निवडणूक भाजपला व्यवस्थित हाताळता आली नसल्याचे सांगत निकाल होऊ द्या मग सगळं सांगतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पुणे पोटनिवडणुकीचा उल्लेख करून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा निशाणा साधला. 'पुण्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला तर आहे तेही जाईल, असं अजितदादा म्हणाले.

'पुण्याचा निकाल काय लागेल माहीत नाही. मतदारांच्या मनात काय आहे सांगता येत नाही. मी मतदारांचा आदरच करतो. पण पुण्यात सरकारमधील सगळ्या नेत्यांना तीन-तीन, चार-चार दिवस बसावं लागलं. काय काय घडलं. तिथं कोण काय करत होतं. मतदानाला जाताना कोणाला काय सांगितलं जात होतं. आज मी बोलणार नाही, एकदा निकाल लागू द्या मग सांगतो, असा इशारा अजित पवार यांनी दिला. (Pune By Election)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT