सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. डोबिंवली मतदारसंघातून भाजपचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. रवींद्र चव्हाण या ठिकाणी निवडून येऊ शकतात.
डोबिंवली विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत होती. निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. भाजपच्या उमेदवाराचं या मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळालं. एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
डोबिंवली विधानसभेचे संभाव्य आमदार हे भाजपचे रवींद्र चव्हाण असतील असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण हे आमदार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.
डोबिंवली विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या तीन टर्मपासून रवींद्र चव्हाण आमदार आहेत. आता चौथ्यांदा ते आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे हे निवडणूक रिंगणात आहेत. चव्हाणांना यंदाची लढाई ही सहज सोपी नाही कारण त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटातून ठाकरे गटात आलेले दीपेश म्हात्रे यांचं आव्हान आहे. यापूर्वी महायुतीमधून शिवसेनेची साथ आतापर्यंत चव्हाण यांना लाभत होती पण आता त्यांच्याच मित्रपक्षातील एक उमेदवार त्यांच्यासमोर असल्यामुळे हवं तेवढे मताधिक्य गाठणं हे चव्हाणांना सोपं नाही. त्यातही संघाचे काही नाराज गट असल्यामुळे त्याचाही फटका चव्हाणांना थोड्या मताधिक्यामध्ये पडू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.