Nandurbar Constituency 
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Nandurbar Constituency: नंदुरबार मतदारसंघामध्ये विजयकुमार गावित आणि किरण तडवी यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये भाजपाचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. नंदुरबार मतदारसंघातून भाजपाचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी विजयकुमार गावित यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. विजयकुमार गावित याठिकाणी निवडून येऊ शकतात.

नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती. निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. भाजपाच्या उमेदवाराचं या मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळालं. एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नंदुरबार विधानसभेचे संभाव्य आमदार हे भाजपाचे विजयकुमार गावित असतील असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे किरण तडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण भाजपाचे उमेदवार विजयकुमार गावित हे आमदार होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नंदुरबार विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे विजयकुमार गावित यांना संधी दिली. विजयकुमार गावित हे गेल्या ३५ वर्षापासून नंदुरबार विधानसभेतून निवडून येत आहेत. तर आता सहाव्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या ३५ वर्षांचा त्यांचा अनुभव त्यातच त्यांच्या कार्यकर्त्यांची बांधणी ही त्यांची पक्की आहे. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने किरण तडवी यांना संधी देण्यात आली. काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी चुरशीची लढत नंदुरबार विधानसभेमध्ये पाहायला मिळायला.

काँग्रेसचे किरण तडवी यांना शिवसेना शिंदे गट उघडपणे मदत करत असल्याचे चित्र देखील या भागात पाहायला मिळालं. काँग्रेसने केलेली मदत नक्कीच भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आहे. नेमकं जनता कोणाच्या बाजूने कौल देईल हे पाहता येणार आहे. सध्या विजयकुमार गावित यांचं पारडं जड असलं तरी निकाल कोणत्या बाजूने लागणार हे पाहणे अतिशय महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

SCROLL FOR NEXT