Karjat Khalapur Constituency 
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: कर्जत खालापूर मतदारसंघातून सुधाकर घारे होणार आमदार? पाहा Exit Poll

Karjat Khalapur Constituency: कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये अपक्षाचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. कर्जत खालापूर मतदारसंघातून अपक्षाचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी सुधाकर घारे यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. सुधाकर घारे याठिकाणी निवडून येऊ शकतात.

कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष विरुद्ध शिंदे गट अशी लढत होती. निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. अपक्ष निवडणूक लढत असलेल्या उमेदवाराचं या मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळालं. एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

शिंदे गटाला ही निवडणूक भारी पडणार, ही जागा भारी पडणार असल्याचं असं चित्र पाहायला मिळत आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ आहे हा जो मतदारसंघ आहे येथे नेहमी बंडखोरी होत असल्याचे पाहायला मिळते. यंदा सुधाकर घारे जे आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून त्यांनी बंड केलेलं होतं आणि ते आता अपक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि संभाव्य आमदार होण्याची शक्यता आहे.

कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात अनअपेक्षित आणि धक्कादायक निकालांसाठी हा मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नितीन सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या येण्याने येथे चुरशीची तिरंगी लढत पाहायला मिळाली. महेंद्र थोरवे यांनी मागच्या वेळी अनअपेक्षित विजय मिळवत सुरेश लाड यांना पराभवाचा धक्का दिला होता. मात्र यावेळची निवडणूक महेंद्र थोरवे यांच्यासाठी आव्हनात्मक असल्याचे पाहायला मिळालं.

कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी निष्ठावान या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली. त्यामुळे महेंद्र थोरवे यांना त्याचा कुठेतरी फटका बसू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यातला संघर्ष यांच्यातलं वैर हे सर्वश्रृत आहे. पण त्याचाही महेंद्र थोरवे यांना फटका बसू शकतो. सुधाकर घारे यांनी दोन ते तीन वर्ष या मतदारसंघाच्या बांधणीसाठी घातली. त्यांचे कार्यकर्ते जोमाने काम करताना दिसून आले. त्यामुळे यात कोणाचा विजय होऊ शकतो हे सांगता येणार नाही असं असलं तरी सुधाकर घारे यांचा प्रचार पाहता सुधाकर घारे यांचं पारडं झाल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT