महाराष्ट्रातील ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी नगराध्यक्षपद आरक्षण जाहीर.
मुंबईत मंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते सोडत जाहीर करण्यात आली.
१७ नगरपरिषद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असतील. यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असते.
दरम्यान मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत निघाली. ३३ नगरपरिषदांपैकी १७ नगरपरिषदेसाठी अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय. ६७ नगरपरिषदपैकी ३४ नगरपरिषद ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेत. तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी १७ नगरपरिषदा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली होती. संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.