Maharashtra 10th Result date  saam tv
महाराष्ट्र

10th SSC Result: ऑल द बेस्ट! दहावीचा निकाल आज, कुठे अन् कसा पाहाल रिझल्ट?

Maharashtra 10th Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. काही तासांत दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल तुम्ही कुठे आणि कसा पाहाल हे घ्या जाणून...

Priya More

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल लागल्यापासून दहावीचे विद्यार्थी देखील निकालाची प्रतीक्षा करत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. आज निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये धाकधूक वाढली आहे. आज दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाईल. ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहायला मिळणार आहे.

यंदा राज्यातून १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहायला मिळणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी ११ वाजता शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. या परिक्षेला राज्यातील १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.६ लाख मुलं, ७.४७ लाख मुली आणि १९ ट्रान्सजेंडर यांचा समावेश होता. दहावीच्या विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवरून निकाल पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांना आणखी काही वेबसाईटवर हा निकाल पाहयला मिळणार आहे.

या इतर वेबसाईटवर पाहू शकता निकाल -

- digilocker.gov.in

- mahahsscboard.in

- mahresult.nic.in

- msbshse.co.in

- mh-ssc.ac.in

- sscboardpune.in

कसा पाहाल निकाल -

- mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर जा.

- होम पेजवर 'महाराष्ट्र दहावी किंवा दहावीचा निकाल 2025' लिंकवर क्लिक करा.

- त्यानंतर लॉगिन तपशील व्यवस्थित भरा.

- दहावीचा निकाल गुणांसह तुम्हाला पाहायला मिळेल.

- निकाल डाऊनलोड करून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT