Mahadev Munde Case Saam tv
महाराष्ट्र

Mahadev Munde Case : धनंजय मुंडेंच्या फोनवरून कराडने महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास थांबवला; ज्ञानेश्वरी यांचा खळबळजनक आरोप

Mahadev Munde : महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी एसपी कार्यालयात विष प्राशन केलं. यानंतर त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर थेट आरोप केला.

Alisha Khedekar

बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला १८ महिने उलटले तरी, अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. या प्रकरणातील तपासाची गती आणि वारंवार बदलत जाणारे तपास अधिकारी या सगळ्यामुळे संतप्त झालेल्या महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंडेंच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर "महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास वाल्मीक कराडनेच थांबवला असून धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन झाल्याचे त्या पोलिसांनी मला सांगितलं" असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला.

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मुंडे यांच्या पत्नी वारंवार प्रयत्न करत आहेत. मात्र तपासातील शून्य प्रगती पाहून संतप्त झालेल्या मुंडे यांच्या पत्नीने टोकाचं पाऊल उचलत पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन केले. त्यांच्या या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला मात्र "असे कितीही गुन्हे दाखल करा आणि माझं एन्काऊंटर जरी केलं तरी मी मागे हटणार नाही" असं वक्तव्य मुंडेंच्या पत्नीने केलं आहे.

ज्ञानेश्वरी मुंडे पुढे म्हणाल्या की, " एकदाच माझं एन्काऊंटर करा म्हणजे तुमच्याकडे कोणीही न्याय मागणार नाही आणि फाईलही बंद होईल, मात्र माझ्या पतीच्या हत्या प्रकरणाची फाईल वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून बंद झाली होती. आणि तो फोन धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामधून गेला होता. " असा खळबळजनक दावा मुंडे यांच्या पत्नीने केला.

"त्याचबरोबर सुरुवातीचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सानप यांचा सी डी आर काढा म्हणजे कोणी कोणी फोन केले हे सर्व समोर येईल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला न्याय द्यावा नाहीतर माझं कुटुंब अनाथ होईल" अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान महादेव मुंडेंना न्याय मिळणार का ? या हत्येमागे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा हात आहे का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT