Mahad News Saam Tv
महाराष्ट्र

Mahad Viral News: महाडमध्ये भररस्त्यात रेड्याचा धुमाकूळ, अनेकांना शिंगावर उचलून फेकलं; लोक जीव मुठीत घेऊन पळाले, थरारक VIDEO

Buffalo Hit 6 People In Mahad Viral Video: उधळलेला रेडा महाडच्या काकर तळे, महाड एसटी स्टँड, सुंदरवाडी रस्त्यावर मोकट धावत सुटला होता. यावेळी या रेड्याने ५ ते ६ नागरिकांना धडक दिली.

Priya More

सचिन कदम, रायगड

रायगड जिल्ह्यातल्या महाडमधून (Mahad) धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका उधळलेल्या रेड्याने महाडमध्ये पाच ते सहा जणांना धडक दिली. महाड शहरामधील काकर तळे येथील ही घटना आहे. उधळलेल्या रेड्याने धडक दिल्याने पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. महाडमध्ये सध्या या रेड्याची दहशत पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उधळलेला रेडा महाडच्या काकर तळे, महाड एसटी स्टँड, सुंदरवाडी रस्त्यावर मोकट धावत सुटला होता. यावेळी या रेड्याने ५ ते ६ नागरिकांना धडक दिली. या रेड्याने या सर्वांना आपल्या शिंगावर उचलून खाली फेकले. या घटनेमध्ये हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाड ट्रॉम केअर युनिट आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमींमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिस, नगर पालिका प्रशासन आणि पशु वैद्यकिय विभागाचे कर्मचारी या उधळलेल्या रेड्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT