Maharashtra Political News  Saam tv
महाराष्ट्र

Panvel : शिंदे गटाच्या आमदारांमध्ये शाब्दिक सामना; गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून मंत्री सामंत यांना टोला, म्हणाले...

मंत्री व रायगड पालकमंत्री उदय सामंत आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यात शाब्दिक सामना पाहायला मिळाला.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Panvel News : पनवेल तालुक्यातील खारघरमध्ये शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये टोले-प्रतिटोले पाहायला मिळाले. मंत्री व रायगड पालकमंत्री उदय सामंत आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यात हा शाब्दिक सामना पाहायला मिळाला.

या कार्यक्रमात आमदार भरत गोगावले यांनी काही कार्यक्रमांच्या अनुपस्थितीवरून मंत्री उदय सामंत यांना मिश्किल टोला लगावला. दोन्ही नेत्यांची जुगलबंदी पाहून उपस्थितांमध्ये शिंदे गटात सारं काही आलबेल आहे ना, अशी चर्चाही सुरू झाली. (Latest Marathi News)

खारघरमधील एका कार्यक्रमात मंत्री व रायगड पालकमंत्री उदय सामंत (Uday samant) आणि महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना आमदार भरत गोगावले ( म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक आणि पुण्यतिथी कार्यक्रम रायगडावर होतो. तर जिजाऊंची पुण्यतिथी ही पाचाडला होते. या तिन्ही कार्यक्रमांना कुठेही असलो तरी जावं लागतं. म्हणूनच ३ वेळा आमदार निवडून दिलं'.

'रायगडावर यायला नशिबात लिहावं लागतं. उदय सामंत यांना राज्यभिषेक कार्यक्रमासाठी नेतो. राज्यभिषेकाच्या कार्यक्रमाला नाही आल्यास पालकमंत्रिपद गेलंच म्हणून समजा', असे पुढे गोगावले पुढे म्हणाले.

'रायगडचा पालकमंत्री हे रायगडावर नाही आले तर ते शिवभक्त कसले? असा टोला भरत गोगावले यांनी उदय सामंत यांना लगावला. त्यावर उदय सामंत यांनी देखील मिश्किल प्रतिक्रिया दिली.

भरत गोगावले यांना उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, 'ज्या ज्या वेळी रायगडमध्ये येतो. त्या-त्या वेळी भरत गोगावले भाषणामध्ये सांगतात, तुमचं पालकमंत्रिपद काढूनच घेतो. म्हणून हल्ली रायगडमध्ये यायला घाबरतो. पुढच्या वेळी मांडवा जेट्टीवरून तुम्ही सोबत असल्याशिवाय बोटीतून जाणार नाही.'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत पोलिसांची आंदोलक शेतकऱ्यांवर दडपशाही, शक्तिपीठ महामार्ग मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

Haldi Yellow Saree Designs: हळदीला पिवळ्या रंगाची साडी का नेसतात? माहितीये का?

Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

SCROLL FOR NEXT