mahableshwar, venna lake, panchgani , satara news saam tv
महाराष्ट्र

Panchgani : मुख्याधिकाऱ्यांवर शाई फेकल्याने पालिका कर्मचारी भडकले; वेण्णा लेक बाेटींग आज बंद

या प्रकरणी पाचगणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ओंकार कदम

Satara : सातारा जिल्ह्यातील पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर (girish dapkekar) यांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून एकाने त्यांच्या अंगावर शाई फेकली. ही घटना पाचगणी मार्केट परिसरात घडली. दरम्यान या घटनेचा निषेध नाेंंदविण्यासाठी महाबळेश्वर (mahableshwar) आणि पाचगणी (panchgani) पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनास प्रारंभ केला. (Breaking Marathi News)

मुख्याधिकारी यांच्या अंगावर शाई फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव अनमोल कांबळे असे आहे. मुख्याधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केला असल्याचा आरोप कांबळे याने केला आहे. त्यांचा ट्रॅक्टर पालिकेच्या कामाला बांधून दिला होता. मात्र अनमोल कांबळे हा सोशल मीडियावर मुख्याधिकाऱ्यांची बदनामी करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करत सुरू असलेला ट्रॅक्टर बंद केला होता. (Panchgani Latest Marathi News)

याचा राग मनात धरून पाचगणी मार्केट परिसरात आज कांबळे याने मुख्याधिकारी यांच्यावर शाई फेकली. या प्रकरणी पाचगणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत वेण्णा लेकचे बोटिंग बंद ठेवलं आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT