Maha Vikas Aghadi Saam TV
महाराष्ट्र

Video : विधानसभा निवडणुकीआधीच रण तापलं! मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत ठिणगी

Maharashtra Politics: लोकसभेतल्या यशामुळे नवीन उर्जा मिळालेल्या मविआला आत्तापासून सत्तेची स्वप्न पडू लागली आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरून मविआत ठिणगी पडली आहे.

Girish Nikam

लोकसभा निवडणुकीत महायुतीवर मात केल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय. विधानसभेसाठी मविआतील तीनही पक्ष सज्ज झालेत. मात्र मविआमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यावरून रस्सीखेच सुरू झालीय.

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं ठरेल, असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी ठाकरेंकडे बघून मतदान केल्याचा सांगत ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे संकेत त्यांनी दिलेत. तर या मुद्यावर बैठकीत चर्चा होईल, मात्र माध्यमांमध्ये चर्चा नको असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय.

एकीकडे मुख्यमंत्रीपदावरुन राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं असताना खुद्द ठाकरेंनी मात्र या मुद्द्यावर थेट बोलणं टाळलंय. आधी महायुतीनं आपल्या अपयशाचा चेहरा जाहीर करावा त्यानंतर योग्यवेळी चेहरा आणू, असं सांगत ठाकरेंनी बगल दिलीय.

मविआचा मुख्यमंत्री कोण?

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री होते. 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 हा ठाकरेंचा कार्यकाळ होता. याच काळात कोरोनाचं संकट आल्यामुळे प्रशासनाचा कस लागला होता. कोरोना काळात देशभरातून उत्तम काम केलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश होता.

ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र मविआत ठरल्याचीही चर्चा होती. मात्र लोकसभेतलं मविआचं यश उद्धव ठाकरेंमुळेच मिळाल्याचा दावा संजय राऊतांनी केल्यामुळे ठाकरे गट मुख्मंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंसाठी आतापासून आग्रही भूमिका घेऊ लागलाय. त्यामुळे विधानसभा निवडणूक ठाकरेंच्या चेह-यावर लढवणार की नाही याबाबत उत्सुकता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest: 'तुम्ही जनरेशन झेड नाहीत...', आशुतोष रांका आणि सौरव दासला हायकोर्टने फटकारले; सीजेपी नेत्यांनी घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये स्वामी समर्थ मंदिरात चोरी; दर्शन घेतल्यानंतर महिलेने चांदीच्या वस्तू लंपास केल्या

Jowar vs Bajra vs Ragi: ज्वारी, बाजरी की नाचणी? कोणत्या पिठात किती कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीन; जाणून घ्या फरक

Sprouted Potatoes: मोड आलेले बटाटे खायचे की नाही? आरोग्यावर काय होतो परिणाम, जाणून घ्या

Shocking : धक्कादायक! पोलिसाने राहत्या घरात आयुष्य संपवलं; अमरावतीत खळबळ

SCROLL FOR NEXT