नीट आणि टीईटीच्या बहुतांश परीक्षा केंद्रे समान असल्याने प्रशासनाला वेळापत्रक बदलावे लागले.
नीट परीक्षेमुळे महाटीईटी 2026 परीक्षा पुढे ढकलली.
महाटीईटीची नवी तारीख २८ जून जाहीर.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देश पातळीवर ‘नीट’ परीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पूर्वनियोजित ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६’ (महाटीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा परिषदेच्या सुधारित वेळापत्रकानुसार राज्यात ही परीक्षा २८ जून रोजी होणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यात ‘महाटीईटी २०२६’ या परीक्षेचे आयोजन २१ जून रोजी करण्यात आले होते. परंतु ‘एनटीए’ने नीट परीक्षा २१ जून रोजी घेणार असल्याचे जाहीर केले. देशभरात विविध केंद्रांवर नीट ही परीक्षा होते. नीट आणि टीईटी या दोन्ही परीक्षांची बहुतांश केंद्र एकच येत असल्याने अखेर राज्य परीक्षा परिषदेने टीईटीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार, ही परीक्षा आता २१ जून ऐवजी आता २८ जून रोजी होणार आहे.
काही प्रशासकीय अडचणींमुळे या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या ‘https://mahatet.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
- प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : १६ ते २८ जून
- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक : २८ जून (वेळ- सकाळी १०.३० ते दुपारी १.००)
- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन : २८ जून (वेळ - दुपारी २.३० ते सायंकाळी ५.००)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.