'मग सांगा चुकलं कोण ?' शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून मनसेची अनोखी बॅनरबाजी विनोद जिरे
महाराष्ट्र

'मग सांगा चुकलं कोण ?' शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून मनसेची अनोखी बॅनरबाजी

मुंबईच्या (Mumbai) अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन बीडच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) अनोख्या पद्धतीने बॅनरबाजी केली आहे.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड : मुंबईच्या (Mumbai) अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन बीडच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) अनोख्या पद्धतीने बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि शरद पवार यांचे फोटो लावून, मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोठे (Rajendra Mothe) यांनी, काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील स्मारक उभा करण्याची घोषणा निवडणुकीच्या वेळी केली होती. मात्र अद्याप स्मारकासाठी एक वीट देखील त्या ठिकाणी ठेवलेली नाही. त्यामुळे मनसेनं या दोन्ही नेत्यांना आपल्या आश्वासनाची आठवण करून देणारे बॅनर. बीडच्या गेवराई शहरांमध्ये लावले आहेत.

हे देखील पहा-

मग सांगा चुकलं कोण ?

- 24 डिसेंबर 2016 ला शिवस्मारक चे जलपूजन करणारे पण अजून साधी वीट ही न उभा करणारे नरेंद्र मोदी ?

- 2009 च्या विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात पाहिले वचन शिवस्मारक चे देऊन अजून साधी वीट ही न उभा करणारे शरद पवार ?

- शिवस्मारक होईल तेव्हा होईल ते किचकट आहे अगोदर शिवराय यांचे गड किल्ले खरे स्मारक आहेत ते सुधारा म्हणणारे राजसाहेब ठाकरे ?

असा उल्लेख असणारे बॅनर सध्या गेवराईकरांचे लक्ष वेधून घेत असून याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.

'मग सांगा चुकलं कोण ?' शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून मनसेची अनोखी बॅनरबाजी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

Crime : आधीच बलात्कार झालेल्या १३ वर्षांच्या पीडितेवर वकिलानेच केला अत्याचार, संपूर्ण देश हादरवणारी घटना

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडाकेबाज कारवाई! प्रसिद्ध ब्लड बँकचा परवाना कायमचा रद्द

SCROLL FOR NEXT