मोठी बातमी ! महाराष्ट्रात स्फोटक घेऊन येत असलेल्या व्यक्तीला मध्यप्रदेश पोलिसांकडून अटक
मोठी बातमी ! महाराष्ट्रात स्फोटक घेऊन येत असलेल्या व्यक्तीला मध्यप्रदेश पोलिसांकडून अटक अरुण जोशी
महाराष्ट्र

मोठी बातमी ! महाराष्ट्रात स्फोटक घेऊन येत असलेल्या व्यक्तीला मध्यप्रदेश पोलिसांकडून अटक

अरुण जोशी

मेळघाट : महाराष्ट्रपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर एक व्यक्ती स्फोटक पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती मध्य प्रदेश देडतलाई पोलिसांना (Dedtalai police) मिळाली. डेडतलाई चौकीचे प्रभारी दिलीप सिंह कॉन्स्टेबल जय मालवीय आणि अमन अग्रवाल यांच्यासोबत देडतलाई खंडवा रोडवर पोहोचले.

रोशनलाल नानुराम गुजर, वय 31, रा. चतुर्भुज पुरा पोस्ट, गुंडाली जिल्हा, भिलवाडा, राजस्थान हे स्फोटके घेऊन येत होते, खबऱ्याने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी शेखपुरा गांवाजवळ विस्फोटसह पुलिसांनी आरोपीला पकडले. सूत्रांनी संगीतले की हा विस्फोटक पदार्थ धारणीकडे येत असल्याची माहिती आहे.

हा आरोपी सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या सुपर पॉवर ब्रँडचे 190 झिलेटिंग रॉड्स घेऊन जाताना पकडण्यात आले आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी रोशनलाल नानुराम गुजर वय 31 याच्यावर गुन्हा क्रमांक 133/22 कलम 5/9बी स्फोटक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास मध्यप्रदेश पोलिस (MadhyaPradesh Police) करत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT