Dhule Accident News Saam TV
महाराष्ट्र

Dhule Accident News: लक्झरी बसचा भीषण अपघात; १८ ते २० प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला पलटली

Luxury Bus Accident News: अपघातात १८ ते २० प्रवासी जखमी झालेत. लक्झरी बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि लक्झरी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

Ruchika Jadhav

Dhule News:

रस्ते अपघाताच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. ब्रेकफेलसह अन्य विविध कारणांनी सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. धुळ्यातही अपघाताची मोठी घटना घडलीये. पुण्याहून गोरखपूरकडे जात असलेल्या लक्झरी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात १८ ते २० प्रवासी जखमी झालेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघातात लहान मुलांचा देखील समावेश. काही लहान मुलंही जखमी झाली आहेत. प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याने जात असताना समोरील वाहनाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे लक्झरी बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि लक्झरी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातानंतर जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले.

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे मुंबई आग्रा महामार्गावर हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बचाव कार्य करत अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांपैकी पाच प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळालीये.

सरकारी वकिलाच्या वाहनाला भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर देखील अपघाताच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. याच महामार्गावरून इगतपुरीजवळच्या भरवीर बुद्रूक शिवारात बुधवारी एक भीषण अपघात झाला होता. मुंबईला जाताना नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला अपघात झाला होता. अजय मिसर हे श्रीरामपूर न्यायालयातून मुंबईला न्यायालयीन कामानिमित्त जात होते त्यावेळी ही घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT