Beed Saam
महाराष्ट्र

Crime: बीडमध्ये सैराट! प्रेमप्रकरणातून प्रिन्सनं तरूणाला कोयत्याने संपवलं; भररस्त्यावर रक्ताचा पाट, आरोपीची कॉल रेकॉर्डींग व्हायरल

Beed News: Young Man Killed Over Love Affair: प्रेमप्रकरणातून एका युवकाची हत्या. दिवसाढवळ्या तरूणाला संपवलं, आरोपीच्या कॉल रेकॉर्डिंगने उडाली खळबळ.

Bhagyashree Kamble

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रेमप्रकरणातून शॉट फिल्म बनवणाऱ्या युवकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. वार इतके जोरदार करण्यात आले होते की, यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मृत तरूणाच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बीडच्या अंबाजोगाईत १ एप्रिल रोजी एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या प्रेम प्रकरणातून शॉट फ्लिम बनवणाऱ्या युवकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. राजकुमार साहेबराव करडे (वय वर्ष २५) असे तरूणाचे नाव आहे. आरोपींनी तरूणावर कोयत्याने गळ्यावर, डोक्यावर आणि पाठीवर सपासप वार केले.

या हल्ल्यात तरूण रक्तबंबाळ झाला होता. गंभीर अवस्थेत त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मृत तरूणाच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच ४ आरोपींविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर ५ मार्चला आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. या प्रकरणात ज्या तरूणीच्या भावाने कोयत्याने वार केले, त्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

वेदांत वैजनाथ शिंदे असे अल्पवयीन आरोपीचे नाव आहे..

वेदांत - तुला फोन केला होता मला तलवारी पाहिजे म्हणून..

मित्र- काय? कुणाचा मर्डर करायचा आहे का?..

वेदांत - त्याचाच करायचाय...

मित्र - नाही रे वेड्या...

वेदांत - ऐकना भाऊ, त्याला एकदा असलं मारलं होतं ना..

मित्र - मी काय म्हणतो ऐक, मॅटर सॉलव्ह झालं असेल ना आता?

वेदांत - नाही..

मित्र- मॅटर काय आहे, आता नेमकं मला काही समजत नाही..

वेदांत - त्याला संपवायचं आहे..

मित्र - पागल झाला आहेस का?

वेदांत - नाही...त्याचा जीव घ्यायचा आहे.

मित्र - अरे ऐक ना..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG price : मोठी बातमी! सांगलीत व्यवसायिक गॅस किंमतीचा स्फोट, वाहनांच्या एलपीजी मोठी वाढ

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

SCROLL FOR NEXT