छत्रपती संभाजीनगरमधून तरुणाने स्वत:वरच केला गोळीबार
तरुण साईनगर भागात राहत होता
पौरोहित्याचे काम करून कुटुंबाला लावत होता हातभार
छत्रपती संभाजीनगरमधून हादरवणारी घटना घडली आहे. राहत्या घरात ३१ वर्षीय तरुणाने रात्री उशिरा स्वत:वर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एन-६ सिडको परिसरातील साईनगर भागात राहणाऱ्या तरुणाने धक्कादायक पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
समीर नाईक असे तरुणाचे नाव आहे. समीरने राहत्या घरातच स्वत:वर गोळीबार केला. समीरच्या कानाजवळून डोक्याच्या आरपार गोळी गेल्याने गंभीर जखमी झालाय. समीरने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
समीर हा आई आणि लहान भावासोबत साईनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याची आई बजरंग चौकात बांगड्यांचे दुकान चालवते. तर समीर पौरोहित्याचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी आई दुकानात गेल्यानंतर समीर घरी एकटाच होता.
काही वेळाने लहान भाऊ घरी परतला असता. त्यावेळी समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या शेजारी पिस्तूलही आढळून आलं. समीरच्या निर्णयाने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमपुरीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादामुळे दोन जण गंभीर जखमी झालेत. दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामरीमध्ये काही जणांना डोक्यावर जबर मार लागला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.