डोंबिवलीतील ग्रीन्स शाळेतील धक्कादायक प्रकार Saam Tv
महाराष्ट्र

SSC Exam Disturbance : परीक्षेत लाऊडस्पीकरचं विघ्न, विद्यार्थी संतप्त

Dombivli News : दहावीच्या परीक्षा सुरू असतानाच डोंबिवलीतील ग्रीन्स शाळेलगत असलेल्या मैदानावर क्रिकेट मॅच सुरू होत्या. या वेळी तेथील लाऊडस्पीकरच्या जोरदार आवाजामुळे विद्यार्थ्यांना त्रास

Saam Tv

कालपासून दहावीच्या परीक्षांना सुरूवात झाली आहे. याच दरम्यान डोंबिवली एमआयडीसी मिलापनगरमधील डॉ. यू. प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रीडांगणावर शनिवार सकाळपासून क्रिकेट मॅचेस सुरू होत्या. यावेळी मोठमोठ्या आवाजात गाणी तसेच समालोचन सुरू होते. या क्रीडांगणाजवळच असलेल्या ग्रीन्स स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती.

लाऊडस्पीकरच्या मोठमोठ्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यास अडथळा निर्माण होत होता. यानंतर ग्रीन्स स्कूल प्रशासनाने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. शालेय प्रशासनाच्या तक्रारीनंतर लाऊडस्पीकर बंद करण्यात आले.

शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर सुरु असताना अशा प्रकारे जोरजोरात लाऊडस्पीकर लावणे कितपत योग्य आहे? लाऊडस्पीकरच्या आवाजाने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत होते. संबंधीत मॅच आयोजकांना याची साधी कल्पनाही नव्हती का? असा संतप्त सवाल पालकवर्ग तसेच विद्यार्थांकडून विचारण्यात येत आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT