Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News : २० वर्षांपूर्वी घर सोडून गेला, शेवटी पांडुरंगानेच दाखवला घरचा रस्ता; काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या

Buldhana : बुलढाण्यातील अवचितराव मोरखडे २० वर्षांनी पंढरपूर वारीदरम्यान भावाला भेटले आणि गावात परतले. त्यांच्या पारत येण्याने संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून, हे विठ्ठलाचं चमत्कार मानत गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं.

Alisha Khedekar

एखादी व्यक्ती घर सोडून निघून जाते, किंवा गर्दीच्या ठिकाणी त्याची कुटुंबाशी ताटातूट होते, आणि बऱ्याच वर्षांनी ती व्यक्ती गावात, कुटुंबात परत येते. अशा कथा आपण अनेक चित्रपटात पाहिली किंवा ऐकली असेल मात्र अशीच एक सत्य घटना बुलढाण्यातून समोर आली आहे.बुलढाण्यातील अवचितराव मोरखडे यांनी कुटुंबावरच्या रागामुळे राहत घर सोडलं. त्यानंतर २० वर्षे बाहेर राहिलेल्या अवचितराव यांना पंढरपूरला वारी दरम्यान त्यांचा भाऊ भेटला आणि अवचितराव यांचं मनपरिवर्तन होऊन घरी परतले आहेत. हा विठ्ठलाचा चमत्कार असावा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील टाकळेश्वर गावातील अवचितराव मोरखडे यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने ते आपल्या कुटुंबासह कामाच्या शोधात गुजरात मध्ये गेले. मात्र त्या ठिकाणी कुटुंबातील कलह आणि मतभेदामुळे त्यांनी कुणालाही न सांगता ते वीस वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेले. आणि त्यानंतर ते बडोदा येथे काम करत स्थायिक झाले.

कुटुंबातील परिस्थिती तसेच मतभेदांमुळे घरी कधीच न येण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दरम्यानच्या काळामध्ये अवचितराव हयात नसल्याची अफवा गावकऱ्यांमध्ये पसरली. आणि कुटुंबासह गावकऱ्यांनी ते परत येण्याची आशा सोडली होती. मात्र यावर्षी ते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी आले आणि त्याच ठिकाणी त्यांना त्यांचा भाऊ भेटला.

दोन भावांच्या भेटी नंतर संपूर्ण गावात अवचितराव जिवंत असण्याची वार्ता पसरली. वीस वर्षानंतर अवचितराव यांना भावाला भेटुन आपल्या कुटुंबाकडे परत जाण्याची ओढ लागली आणि त्यांचा कुटुंबावरील राग शांत झाला. तसेच त्यांनी गावात परतण्याचा निर्णय घेतला. अवचितराव गावात पोहोचताच त्यांच्या कुटुंबासह गावकऱ्यांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत केले.

एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. सर्व गावकरी त्यांना भेटायला आले. विठुरायानेच त्यांचे मन परिवर्तित करून त्यांना घरचा रस्ता दाखवला आणि कुटुंबाची भेट घालून दिली.अशा भावना गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT