New Year Celebration Saam tv
महाराष्ट्र

New Year celebration: पर्यटकांनो सावधान! नववर्षाचे सेलिब्रेशन करताना जपून; लोणावळा पोलिसांचा इशारा

Happy New Year 2024: नवर्षाच्या स्वागताला आत्तापर्यंत तब्बल १० हजार वाहने दाखल झाली आहेत. पर्यटकांच्या वाहनांची तपासणी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Gangappa Pujari

New Year Celebration 2024:

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी पर्यटनस्थळांना भेट देण्याचा प्लॅन केला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोणावळ्यात दाखल झाले आहेत. याकाळात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांवर तसेच हुल्लडबाज पर्यटकांवर थेट कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लोणावळ्यात पर्यटक दाखल..

थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोणावळ्यात (Lonavala) पर्यटकांनी गर्दी केली आहे. शहरात आत्तापर्यंत तब्बल १० हजार वाहने दाखल झाली आहेत. पर्यटकांच्या वाहनांची तपासणी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे. पर्यटकांनी मद्यशील पदार्थ पर्यटन नगरीत आणू नये यासाठी ही तपासणी मोहीम सुरू आहे. तसेच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाईचा इशारा लोणावळा पोलिसांनी दिला आहे.

नाशिक पोलीसही सज्ज!

नववर्षाच्या पुर्वसंधेला नाशिक पोलीस (Nashik) प्रशासनानेही कडक बंदोबस्ताची तयारी केली आहे. नागरिकांच्या उत्साहाला गालबोट लागू नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाणार आहे. नववर्षाचा जल्लोष करताना अतिउत्साहात दारू पिऊन वाहन चालवणारे आणि धांगडधिंगा घालणाऱ्या व्यक्तींना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासाठी शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस उपायुक्त, सहा सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह स्थानिक पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दल, दंगल नियंत्रण पथक देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.

तसेच पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जाणार आहे. नाशिक शहरात हॉटेल्सना रात्री एक वाजेची परवानगी असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, असं आवाहन पोलिसांनी केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT