Shraddha Thik
रोजच्या रुटिनचा अगदीच कंटाळा आला की लोक या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देतात आणि सुट्टीचा आनंद घेतात. मुंबई आणि पुण्यातील माणसांसाठी लोणावळा म्हणजे हक्काचं पर्यटन ठिकाण.
अगदी तास-दीड तासाच्या अंतरावर असलेल्या लोणावळ्याला भेट देण्यासाठी सुट्टीचा एक दिवस देखील पुरेसा असतो.
आपल्यापैकी अनेकांनी हॉटेल 7/12 बद्दल याआधीही ऐकलं असेल. अस्सल कोल्हापुरी चवीच्या जेवणासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे.
लोणावळा शहराच्या अगदी मधोमध असलेलं, खवय्यांच्या मनात बसेल असं ठिकाण म्हणजे हॉटेल मावळ मराठा.मुख्य रस्त्याला लागून असलेलं ढाबा स्टाईलमधील हे हॉटेल तेथील गावरान चवीच्या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.
महाबळेश्वरमधील मॅप्रो गार्डनचा अनुभव आता लोणावळ्यात देखील घेता येतो, कारण याचीच एक शाखा लोणावळ्यात देखील सुरू झाली आहे. जर तुम्हाला फ्रेश स्ट्रॉबेरी क्रिम, फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रिम चाखण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर लोणावळ्यातील मेप्रो गार्डन एक उत्तम ठिकाण आहे.
मुंबईतून जे पर्यटक लोणावळ्याला जातात, त्यांनी नाश्त्यासाठी खंडाळा घाटातील सितारा गार्डन रेस्टॉरंटमध्ये नक्की थांबावं. येथील खाद्यपदार्थांपेक्षा गार्डन व्ह्यू असणारी आसन व्यवस्था आणि थंडगार वारा मनाला एक वेगळाच आनंद देतो.
मटकीची मिसळ तर तुम्ही खाल्लीच असेल. पण तुम्ही कधी चिकन मिसळचा आस्वाद घेतलाय का? ऐकूनच कुतूहल वाटत असेल ना? तर हो, लोणावळ्यात एक असं ठिकाण आहे, जिथे चिकन मिसळ खाण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.