Lonavala Crime News Saam TV
महाराष्ट्र

Lonavala Crime News: लोणावळ्यातील अवैध मटका व्यवसाय पोलिसांनी लावला उधळून; तब्बल १७ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

पोलिसांनी धाड टाकत तब्बल १७ लाखांहून अधिक मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lonavala Crime News: नववर्षाच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. अनेक व्यक्ती ३१ डिसेंबरच्या पार्टीची तयारी करत आहेत. अशात लोणावळ्यात वेहेरगाव येथे गेल्या काही दिवसांपासून अवैध मटका धंदा सुरू होता. यावर पोलिसांनी धाड टाकत तब्बल १७ लाखांहून अधिक मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. (Latest Lonavala Crime News)

पोलिसांना या मटक्याची टीप मिळाली होती. त्यानंतर सापळा रचत पोलिसांनी यावर छापा टाकला. उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांच्यासह लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा मारत पाच जणांकडून तब्बल १७ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत कारवाई केली आहे.

परिसरात या घटनेने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण मटका व्यवसायाने येथील अनेक घरे उद्धस्त झाली आहेत. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाईक कार्तिक यांनी स्वतः पथकासह लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेहरगाव येथे छापा मारला. संतोष बोत्रे, राहुल गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर संजय रेवाळे, चंद्रकांत धावजी देवकर, जयेश जनार्दन खोत, सिद्धार्थ फकीरराव खरात, प्रमोद दामू अहिरे आणि दत्त जाधव अशी मटका खेळत असताना पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सदर घटनेत पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच लोणावळ्यातील अनेक बार, रेस्टॉरंटवर देखील छापेमारी सुरू आहे. ३१ डिसेंबर निमित्त शहरात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री तसेच मटका असे प्रकार घटत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडण्याआधीच पोलिसांचे एक पथक असे व्यवसाय बंद पाडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT