Supriya Sule  Saam Tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election: सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातून लोकसभा लढवणार; अजित पवार काय भूमिका घेणार?

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे ह्या चौथ्यांदा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं दिसत आहे. इंदापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मागणार असल्याचं सांगितलं. सुप्रिया सुळे यांच्या या दाव्यामुळे अजित पवार गटाचं टेन्शन वाढणार आहे.

Bharat Jadhav

मंगेश कचरे

Baramati Constituency Supriya Sule :

यंदाच्या लोकसभा निवडणूक बारामतीसह राज्यातील मतदारांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. ही लोकसभा निवडणूक बारामती मतदारसंघात चुरशीची ठरणार आहे. या मतदारसंघातून चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार सुप्रिया सुळे केलाय. यामुळे अजित पवार आणि त्यांच्या गटासमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. (Latest News)

बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी तीनवेळा मला संधी दिलीय. येत्या निवडणुकीत देखील मी महाविकास आघाडीकडे बारामती लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मागणार आहे. यासाठीच आज मतदारसंघातील इंदापूरात महाविकास आघाडीतल्या सर्व घटकांशी चर्चा करून त्यांना विचारात घेऊन त्यांची मान्यता घेण्यासाठी बैठक घेतल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या इंदापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डिसेंबर महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) बारामती मतदारसंघावर (Baramati Constituency) दावा केला होता. खुद्द अजित पवारांनीच रायगडमधील कर्जत येथील पक्षाच्या मंथन शिबिरात अजित पवारांनी हा दावा केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी बारामतीसोबतच रायगड, सातारा आणि शिरुर या लोकसभा मतदारसंघांवरही दावा केला होता. दरम्यान बारामतीच्या मतदारसंघावर भाजपचाही डोळा आहे.

भाजप त्यावर दावा ठोकण्याच्या आधी अजित पवार यांनी त्या जागेसाठी दावा ठोकला होता. दरम्यान गेल्या काही दिवासांपूर्वी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार हे देखील बारामतीमधून रिंगणात उतरणार असल्याचं चर्चा आहे.

राजकारणात खालच्या पातळीवर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिलीय. मी एका भारतीय जनता पक्षाचा नेत्याला फोन करून सांगितलं होतं की अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करणं आपण थांबूया. ही आपले संस्कृती नाहीये.. मात्र असं होताना दिसत नाही अशी नाराजी यावेळी त्यांनी बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

Local Body Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, ठाकरे अन् शिंदेंचे शिलेदार फोडले

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

SCROLL FOR NEXT