Rahul Gandhi Criticized PM Modi Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'देशात इंडिया आघाडीचेच सरकार; फॉर्म्युलाही तयार', काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सर्वात मोठा दावा!

Maharashtra Politics Breaking News: येत्या दोन दिवसात एनडीए आघाडीचे नवे सरकार स्थापन होण्याबाबतच्या हालचाली सुरू असतानाच देशामध्ये इंडिया आघाडीचेच सरकार येणार असल्याचा सर्वात मोठा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, ता. ५ जून २०२४

लोकसभेच्या निकालानंतर राजधानी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाकडेही स्पष्ट बहुमताचा आकडा नसल्याने नेमकं सत्तेच्या सारीपाटात कोण जिंकणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

"राज्यात काल आलेल्या निकालात काँग्रेसने बाजी मारत राज्यात सर्वात जास्त सीट निवडून आणल्या आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेसचं मोठा भाऊ ठरला आहे. देशात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली. या यात्रेत जनतेला गॅरंटी दिली याचा विश्वास जनतेने दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदी विरूध्द जनता अशी लढाई होती. यात जनतेचा विजय झाला आहे," असे नाना पटोले म्हणालेत.

तसेच "देशात दोन दिवस खूप घडामोडी घडणार आहे. यात इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात बनणार आहे. फॉर्म्युला तयार आहेत ते सांगायचे नसतात," असा सर्वात मोठा दावाही नाना पटोले यांनी केला. नाना पटोले यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

विजय वडेट्टीवारांचाही मोठा दावा

"देशातील जनतेने मोदी आणि शाह जोडीला नाकारले. दोघांशिवाय तिसऱ्याचे नाव जनतेला माहीत नाही. ज्यांचे नाव माहीत असते त्यांना अडचणीत आणतात आणि स्वतंत्र हिरवतात. ही मंडळी सत्तेवर येणार नाही. INDIA आघाडी ची सत्ता येणार आहे," असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनीही केंद्रात सत्ता स्थापनेचा दावा घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील जुना बाजार चौकात 'राडा'

ASI पोलिसाची धारदार शस्त्राने हत्या, निर्जनस्थळी रक्ताळलेल्या अवस्थेत फेकून दिलं, पोलीस दलात खळबळ

शेतकऱ्यांचा रोष उफाळला! कर्जमाफीच्या मागणीवरून अजित पवारांना काळे झेंडे, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

Tamhini Ghat Accident : काळाचा घाला! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, सनरुफ तोडून दगड कारमध्ये पडले, महिलेचा जागीच मृत्यू

Dhaba Style Malai Kofta Recipe: ढाबा स्टाईल मलाई कोप्ता घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT