Sanjay Raut  Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : जळगावची उमेदवारी निश्चित आहे का? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

Jalgaon : वंचितबाबत बोलताना राऊतांनी पुढे म्हटलं की, आम्ही चर्चा बंद केलेली नाही, वंचितच्या नेत्यांनी बंद केली. आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव शेवटी दिलेला आहे. ते म्हणत असतील की आम्हाला तीनच जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तर तसं नाही.

Ruchika Jadhav

Lok Sabha Election :

लोकसभा निवडणुकीसाठी हायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून काही जागांवर तिढा तर काही जागांसाठी नाराजीनाट्य सुरू असल्याचं दिसत आहे. अशात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील नाराज असून लवकरच ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार अशा चर्चा आहेत. त्यावर संजय राऊतांनी देखील सूचक वक्तव्य केलंय.

उन्मेष पाटील यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता. अनेक वर्ष ते भाजपाचे काम करत आहेत. अनेक चळवळींशी ते जोडले आहेत. त्यांची प्रतिमा उत्तम आहे, तरी देखील भाजपने त्यांची उमेदवारी कापली. त्याबद्दल आम्हाला आश्चर्य आहे. ते अस्वस्थ आहेत हे नक्की. ते आम्हाला भेटलेत आणि चर्चा झाली आहे. आता ते पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले आहेत, असं संजय राऊतांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंशी भेट झाल्यानंतर पुढील गोष्टी उद्यापर्यंत नक्की कळतील. आमची मैत्री फार जुनी आहे. त्यांची मन की बात त्यांनी सांगितलीये, त्यामुळे उद्यापर्यंत तुम्हाला सर्व समजेल, असंही संजय राऊत म्हणालेत.

उन्मेष पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातले शेकडो सहकारी त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत, असंही संजय राऊतांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं आहे.

वंचितबाबत बोलताना राऊतांनी पुढे म्हटलं की, आम्ही चर्चा बंद केलेली नाही, वंचितच्या नेत्यांनी बंद केली. आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव शेवटी दिलेला आहे. ते म्हणत असतील की आम्हाला तीनच जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तर तसं नाही.

पाच जागांच्या प्रस्तावामध्ये अकोला सुद्धा आहे, रामटेक शिवसेनेची जागा असून देखील रामटेक, धुळे, मुंबईतील एक जागा देण्याच्या विचारात आम्ही होतो आणि पाचवी जागा सुद्धा त्यांच्यासाठी काढून ठेवली होती, असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT