Nilesh Lanke saam tv
महाराष्ट्र

Nilesh Lanke : लोक मला नोट आणि व्होटही देतात; निलेश लंकेंनी थेट खिशातून पैसे काढून दाखवले!

Ahmednagar Constituency : शेतकरी कांद्याची पट्टी, सेवा निवृत्त शिक्षकांने एक महिन्याची पेन्शन दिल्याचा किस्सा देखील लंके यांनी यावेळी सांगीतला. पुरावा म्हणून त्यांनी खिशातील ५०० आणि हजाराच्या नोटा देखील काढून दाखवल्यात.

Ruchika Jadhav

Lok Sabha Election :

निलेश लंके यांनी प्रचारादरम्यान महत्त्वाचं वक्तव्य केलंय. लोक मला नोटही देतात आणि व्होटही देतात, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी खिशातून पैसे काढून दाखवत कुणी, किती रुपये दिले,याचीही माहिती दिली. सर्वसामान्य लोकांकडूनच आपल्याला आर्थिक मदत मिळत असल्याचं निलेश लंके यांनी नमूद केलं आहे. ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

निलेश लंके अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात असणाऱ्या लंकेंनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर लंकेंनी केलेलं हे वक्तव्य आता चांगलंच चर्चेत आलं आहे. एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले १०० रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने कष्टाने कमवलेले ५०० रुपये निवडणुकीसाठी मला मदत दिली, असंही निलेश लंकेंनी यावेळी सांगितलं आहे. अहमदनगरच्या माहीजळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा गेली होती. त्यावेळी तेथे देखील एका शेतकऱ्याने त्यांना आर्थिक मदत दिली आहे.

स्वाभिमान जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून लोक भरभरुन प्रेम देत आहेत. प्रत्येक सभेत आपल्याला आर्थिक मदत मिळत आहे. शेतकरी कांद्याची पट्टी, सेवा निवृत्त शिक्षकांने एक महिन्याची पेन्शन दिल्याचा किस्सा देखील लंके यांनी यावेळी सांगीतला. फक्त किस्से सांगितले नाही, तर पुरावा म्हणून त्यांनी खिशातील ५०० आणि हजाराच्या नोटा देखील काढून दाखवल्यात.

अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीकडून निलेश लंके तर महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आता लंकेंनी जोरदार प्रचार करण्यास सुरूवात केल्याचं दिसतंय. लोक मला नोट आणि व्होटही देतात, या वक्तव्याने ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT