Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर

Amol Kirtikar Party Candidate: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा कंबर कसली आहे. लोकसभेसाठी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीर झाली आहे.

Rohini Gudaghe

Lok Sabha Election Maharashtra Politics

राज्यातील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar ) यांची मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) उद्धव ठाकरेंनी राज्यभर राज्यभर दौरे सुरू केले आहेत. पक्ष, चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी परत पक्षबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात (Mumbai North West Lok Sabha Seat) केलीय.  (latest marathi news)

याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी मुंबईत शिंदे गटावर पहिला मोठा डाव टाकला आहे. त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar Party Candidate) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर सध्या शिंदे गटात आहे.

महायुतीचा उमेदवार कोण

सध्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून गजानन कीर्तीकर हे शिंदे गटाचे खासदार आहेत. अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, अमोल कीर्तीकरला तुमच्याकडे (Lok Sabha Election) दिलाय. जबाबदारी तुमची आहे हे लक्षात ठेवा. मी प्रचाराला येणार नाही, थेट विजयी सभेला येणार असल्याचं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं (Maharashtra Politics) आहे. अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT