m eknath shinde, devendra, ajit pawar news Saam TV
महाराष्ट्र

Lok Sabha Election: लोकसभा जागा वाटपावरून शिवसेना आक्रमक, शिंदे २२ जागा लढवण्यावर ठाम?

Shiv Sena Bjp Ncp Alliance: लोकसभा जागा वाटपावरून शिवसेना आक्रमक, शिंदे २२ जागा लढवण्यावर ठाम?

Satish Kengar

>> सूरज सावंत

Shiv Sena, Bjp, Ncp Alliance News:

लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकतो. प्रत्येक पक्षाने यासाठी लोकसभा मतदार संघात चाचपणी सुरू केली आहे. असे असले तरी सध्याची राजकिय परिस्थिती पाहता. महाराष्ट्रात सत्तेवरील तीन पक्षांमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य रंगू शकत. कारण अजित पवारांना सोबत घेतल्यानंतरही शिवसेना लोकसभा निवडणुकीला वाटाघाटी करायला तयार नाहीत. २०१९ च्या लोकसभेला लढलेल्या सगळ्या जागांवर शिंदे यांची शिवसेना आग्रही आहे.

शिवसेना भाजप सरकारची वर्षपूर्ती होत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सत्तेत 'इंट्री' झाली. अजित पवार यांच्या इंट्रीने सत्तेतील इतर दोन्ही पक्षात 'कभी खुशी कभी गमचा सिलसिला' सुरू झाला. अजित पवार यांना सत्तेत सहभागी होऊन तीन महिने झाले तरी पालकमंत्रीपदं मिळत नसल्याने नाराज झालेल्या अजित पवारांना खुश करण्यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री पदांचे वाटप करून त्यांचे सात्वन केले.

मात्र येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जागा वाटपाबाबत शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेत, मागच्या वर्षीच्याच फाॅर्मुल्यानुसार शिवसेना जागा लढवणार आहे. लोकसभेसाठी होत्या, त्या जागा तुम्ही लढवाव्यात हे सांगण्यात आल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

मागच्या वर्षीच्या फाॅर्मुल्यानुसार शिवसेना २२ तर भाजप २६ जागा लोकसभेला लढवल्या होत्या. यात शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला होता. तर ४ जागांवर पराभव झाला. मात्र आता शिवसेनेकडूनही लोकसभेच्या तयारीची सुरूवात करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

शिवसनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मतदारसंघात पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभेच्या या २२ जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केले. शिवसेना शिंदे गटाकडे सध्या १८ पैकी १३ खासदार आहेत, तर ठाकरे गटाकडे ५ खासदार आहेत. ठाकरे गटाकडे असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उमेदवार कोण असणार याचा निर्णय एकनाथ शिंदे लवकरच घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांनी २०१९ साली युतीमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्रातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपने २५ जागा लढवून २३ जागांवर विजय मिळवला होता. तर शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी १८ जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेच्या अनुक्रमे २५ आणि १९ जागा लढवल्या होत्या.

यातच चार जागांवर घटकपक्षाचे उमेदवार उभे होते. आता राष्ट्रवादी काॅग्रेसचे अजित पवार यांची सत्तेत इंट्री झाल्याने भाजप आणि शिवसेनेसमोर लोकसभा जागा वाटपांचं मोठं आवाहन आहे. त्यात शिवसेनेना मागच्याच फाॅर्मुल्यावर ठाम असल्याने युतीत अजित पवार यांच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा येतात, की जागावाटपावरून युतीत मिठाचा खड्डा पडतो हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मोबाइलची सवय सुटावी म्हणून मुलीला आजोळी पाठवलं, मामा अन् त्याच्या मुलानं केला बलात्कार

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन

Mumbai Pune Expressway : मोठी बातमी! पुण्याहून मुंबईला येणार्‍या सर्व एसटी बसेस रद्द, २१ तासांपासून एक्सप्रेस वे ठप्प, प्रवास टाळाच, कारण...

मी जातपात मानत नाही, माळी समाजाचा उल्लेख; अजितदादांनी मृत्यूआधी कॉलवर नाव घेतलेल्या नेत्याने सगळं काही सांगितलं

लोकसभेच्या गेटवर राडा! बघा गद्दार चालले; काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या मंत्र्याला राहुल गांधींनी डिवचले, मंत्री म्हणाले...,

SCROLL FOR NEXT