स्थानिक गुन्हे अन्वेषणाचा विभागाचा छापा; लाखोंचा अफू जप्त भूषण अहिरे
महाराष्ट्र

स्थानिक गुन्हे अन्वेषणाचा विभागाचा छापा; लाखोंचा अफू जप्त

धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हट्टी खुर्द गावात छापा टाकत एका घरातून सव्वा चार लाखांची अफूची बोंडे जप्त केली आहेत.

भूषण अहिरे

धुळे: धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने Crime Branch हट्टी खुर्द गावात छापा टाकत एका घरातून सव्वा चार लाखांची अफूची बोंडे जप्त केली आहेत. संबंधित ठिकाणाहून संशयित फरार झाला असून त्याच्याविरुद्ध निजामपुर Nujampur पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. Local Crime Branch seizes lakhs of opium

साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द गावातील गोरख भगत उर्फ गोरख रामचंद्र पदमोर याने त्याच्या घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अंमली पदार्थाची बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केला, असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

हे देखील पहा-

त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोरख भगत यांच्या घरी छापा टाकला. त्या दरम्यान संशयित पसार झाला आहे. पथकाने घराची तपासणी केली असता 9 गोणीमध्ये अफूची सुकलेली बोंडे भरलेली आढळून आली. एकूण 4 लाख 35 हजार 750 रुपये किमतीची 62 हजार 250 किलो अफूची सुकलेली बोंडे जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी गोरख भगत याच्याविरुद्ध एनडीपीएस एक्ट कलम 8 (क), 18,19 प्रमाणे निजामपुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT