wardha local crime branch arrests youth along with 9 two wheelers saam tv
महाराष्ट्र

Wardha News: ९ दुचाकींसह चाेरास अटक; वर्धा, नागपूर, चंद्रपूरातील गुन्हे उघडकीस

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha Crime News :

वर्धा शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढू लागल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने (wardha local crime branch) समांतर तपास सुरू होता. यादरम्यान पोलीसांनी एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

केळझर येथे एक जण त्याच्या ताब्यातील जुनी दुचाकी विक्री करण्यासाठी संशयास्पद रित्या फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता वर्धा, नागपूर, वरोरा व चंद्रपूर येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार उमेश अनिल भोयर (रा. हेलोडी, ता. सेलू) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून वर्धा, नागपूर व चंद्रपूर येथील दुचाकी चाेरीचे गुन्हे उघडकीस करण्यात पाेलीसांनी यश आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, मनीष कांबळे, पवन पन्नासे, प्रदीप वाघ, शिवकुमार परदेशी व अखिल इंगळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Accident: भरधाव टिप्परनं दोघांना चिरडलं; होमगार्डची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

बोल्डनेसचा तडका! 'या' भोजपुरी अभिनेत्रीच्या कातिल सौंदर्यावर नेटकरी झाले फिदा; पाहा व्हायरल फोटो

Ananya Pandey:'साई पल्लवीशी तुझी तुलना होऊच शकत नाही'; भरतनाट्यममुळे अनन्या पांडे ट्रोल, मिम्सचा पाऊस

Crime News : प्रसिद्ध मराठी गायकाकडून खंडणी वसूल, लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणाची दिली धमकी

Maharashtra News Live Update: पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT