wardha, wardha crime news Saam Tv
महाराष्ट्र

Wardha News : क्रिकेटवर सट्टा घेणारे दाेघे अटकेत, 18 जण LCB च्या रडारावर; पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यापर्यंत देखील माहिती पाेहचली.

साम न्यूज नेटवर्क

- चेतन व्यास

वर्धा शहरात क्रिकेटवर लागणारा सट्टा राेखण्यासाठी पाेलिसांनी ठाेस पावलं उचलली आहेत. पाेलिसांनी सुमारे वीस सट्टेबाजांवर कारवाई केली आहे. त्यापैकी दाेघांना अटक करण्यात पाेलिसांना यश आले आहे. या कारवाईत सुमारे पंचवीस लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) केली आहे.

वर्धा (wardha) पोलिस ठाण्याच्या हद्दीत आसिफ शेख हा निखिल पंजवानी याच्या सोबत संगनमत करून एका क्रिकेट लीगच्या मॅचेससाठीचा ऑनलाईन सट्टा चालवीत आहे याची माहिती पाेलिसांना मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यापर्यंत देखील माहिती पाेहचली.

स्थानिक गुन्हे शाखेने कच्छी लाईन परिसरात धाड टाकली. त्यावेळी दाेघांना रांगेहाथ पकडले. त्यांच्या चाैकशी केली असता ते सट्टा चालवीत असल्याची माहिती समाेर आली. पाेलिसांनी दाेघांना अटक (arrest) केली. दरम्यान संशयितांच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. (Maharashtra News)

त्यामुळे अठरा लोकांचा सट्टा प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी वीस जणांवर विविध कलमन्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी चारचाकी वाहन, मोबाइलसह 25 लाख 73 हजार 950 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT