महाराष्ट्र

भाजप आणि शिंदेसेनेत वादाची ठिणगी, राणे बंधूंमध्ये वाद पेटला; नेमकं काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत वादाची ठिणगी पडलीय... अशातच आता राणे बंधू ही आमनेसामने आलेत... तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंची पाठराखण केलीय... नेमकं प्रकरण काय आहे? राणे बंधूंमध्ये वाद का पेटलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर धाड टाकत शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंनी पैसे वाटपाचा आरोप केला. त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांवर निशाणा साधलाय. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ नितेश राणे मैदानात उतरले. मात्र त्यांनी आपले बंधू निलेश राणेंचीही बाजू घेतली आहे. निलेश राणेंचा बकरा केला जातोय, अशी टीका केली. मालवणमधील महायुतीतील वादामुळे दोन्ही बंधू आमनेसामने आलेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदेसेना एकमेकांवर कुरघोडी करतेय. त्यात निलेश राणेंनीही गौप्यस्फोट केलाय... मी भाजपची ऑफर धुडकावली..एकवेळ शिंदेंचा पीए होईन पण पक्ष सोडणार नाही, असं विधान निलेश राणेंनी मालवणमधील सभेत केलयं...तर शिंदेंनींही आपल्या भाषणात निलेश राणेंचं कौतुक करत पाठराखण केलीय...

मालवणमधील सभेआधी नारायण राणे, निलेश राणे आणि एकनाथ शिंदेमध्येही बैठक झाल्याचंही समोर आलयं... भाजप- शिंदेंसेनेतील वाद विकोपाला पोहचलेला असताना या बैठकीत नेमकं काय घडलं? याची उत्सुकता आहे. मात्र पक्षाच्या बांधिलकीमुळे दोन भावांमध्ये झालेला वाद वडील नारायण राणे कसा सोडवणार? याकडेही अनेकांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT