Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.  saam tv
महाराष्ट्र

Politics : शिंदेंची ताकद वाढली, भाजप नेत्याच्या पुतण्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश; थंड महाबळेश्वरचं वातावरण तापलं

Maharashtra Politics : थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचं वातावरण तापलं आहे. तिथं एकनाथ शिंदेंची ताकद वाढली असून, भाजप नेत्याच्या पुतण्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर या प्रवेशानं अजित पवार गटालाही धक्का बसणार आहे.

Nandkumar Joshi

  • ऐन निवडणुकीत महाबळेश्वरचा पारा चढला

  • एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर राजकीय वातावरण तापलं

  • अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश

  • अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं

ओंकार कदम, सातारा | साम टीव्ही

मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमधील राजकीय वातावरण ऐन पालिका निवडणुकीत तापलं आहे. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार मदनदादा भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, शनिवारी महाबळेश्वर दौऱ्यावर आले होते. त्यांनी शिवसेना पक्षप्रवेश कार्यकर्ता मेळाव्यात हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री शंभुराजे देसाई हे देखील उपस्थित होते. भाजपचे नेते माजी आमदार मदनदादा भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

महाबळेश्वरमधील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा प्रवेश

महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावांतील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. लाडकी बहीण योजनेविषयी भाष्य करत ही योजना कधीही बंद पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमधील नगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानं तेथे मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिंदे यांच्या दौऱ्यानंतर थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचं राजकारण तापलं आहे. मदत व पुनर्वसन मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तेथील दिग्गज नेते मकरंद पाटील यांच्या चिंतेतही वाढ झाल्याचे बोलले जाते. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT