Malegaon Corporation Saam Tv
महाराष्ट्र

Malegaon News: मोठी बातमी! मालेगाव महापालिकेत ६ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, नगरसेवकांसह माजी आमदार अडकले

Malegaon Corporation: मालेगाव महानगर पालिकेत आज मोठी दुर्घटना घडली. मालेगाव महानगर पालिकेच्या इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. या लिफ्टमध्ये माजी आमदारासह काही नगरसेवक होते.

Priya More

Summary -

  • मालेगाव महापालिकेच्या इमारतीत लिफ्ट कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली

  • लिफ्टमध्ये नगरसेवक आणि माजी आमदार आसिफ शेख अडकले होते

  • लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती.

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

अजय सोनावणे, मालेगाव

मालेगाव महापालिकेत आज मोठी दुर्घटना घडली. पालिकेच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. लिफ्टमध्ये प्रमाणापेक्षा जास्त जण घुसल्याने लिफ्ट धाड धाड आवाज करत खाली कोसळली. लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे काही नगरसेवक आणि माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह माध्यमकर्मी होते. सुदैवाने सर्वाना सुखरूप आहेत. यात कोणालाही जखमी झाले नाही. महालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत कार्य करत सर्वांना बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यावर सर्व सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इस्लाम पार्टीचे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख त्यांचे काही नगरसेवक मध्यमकर्मी हे शुभेच्छा दिल्यानंतर पालिकेच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली येण्यासाठी निघाले.

हे सर्वजण एकाच वेळी लिफ्टमध्ये गेले. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने लिफ्टचा दोरखंड तुटला आणि ही लिफ्ट थेट ग्राउंड फ्लोवर येत असताना अडकली. त्यानंतर ही लिफ्ट खाली कोसळली. मोठा आवाज झाल्याने सर्व जण धावत खाली आले आणि मदतकार्य सुरू झाले आणि सर्वाना एकेक करत खाली उतरवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT