Chandrapur Leopard  Saam TV
महाराष्ट्र

Chandrapur News: रेल्वेच्या इंजिनवर चढलेल्या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू; चंद्रपुरातील घटना

Leopard Climbed on Train Engine: इंजिनच्या वर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

संजय तुमराम

Chandrapur Leopard News: बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. शहरीकरणामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत आढळून येत आहेत. मात्र अनेकदा हे या प्राण्यांच्या जीवावर बेतताना दिसतं. चंद्रपुरात एका बिबट्याचा अशाच प्रकारे मृत्यू झाला आहे.

मालगाडीच्या इंजिनवर बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. घुग्घुस येथील न्यू रेल्वे कोल साइडिंग येथील ही घटना आहे. आज सकाळी ही मालगाडी चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनमधून या कोल सायडिंगमध्ये दाखल झाली. त्यावेळी इंजिनच्या वर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. (Latest News Update)

चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन परिसरात मोठया प्रमाणात वन्यजीवांचा वावर आहे. त्यामुळे मालगाडीच्या वर चढलेल्या बिबट्याला हाईटेंशन इलेक्ट्रिक ताराचा स्पर्श झाला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वनविभाग आणि रेल्वे प्रशासन घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT