amravati saam tv
महाराष्ट्र

Leopard Enters In Amravati : बिबट्या आला रे..., अमरावतीकरांची उडाली घाबरगुंडी; वनविभाग घटनास्थळी दाखल

या बिबट्याला पाहण्यासाठी विलासनगर भागात नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : अमरावती शहरात मध्यवस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांची एकच पळापळ झाली. या घटनेची माहिती शहरात वा-या सारखी पसरली. त्यामुळे अमरावती शहरातील शोभानगरच्या माणिपूर ले आऊट परिसरात नागरिकांची एकच गर्दी उसळली (Maharashtra News)

अमरावती शहरातील शोभानगरच्या माणिपूर ले आऊट मध्ये बिबट्या शिरला. हा बिबट्या आल्याने नागरिकांचा दंगा सुरु झाला. यामुळे बिबट्या सैरभैर पळत सुटला. परिणामी नागरिकांत कमालीची भिती पसरली.

दरम्यान गेल्या तीन तासांपासून याच भागात पोलीसांसह वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. घटनास्थळी वनविभागाच्या अधिका-यांनी जाळ्या लावल्या आहेत. या बिबट्याला पाहण्यासाठी विलासनगर भागात नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने मदत कार्यात अडचणी येताहेत.

दरम्यान या परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल हाेत नसल्याचा आराेप केला आहे. बिबट्याला तात्काळ पकडा अशी मागणी नागरिक करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT