Leopard Attack Saam Tv
महाराष्ट्र

Leopard Attack: घरात बसून टीव्ही पाहत असताना बिबट्याने केला हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

Ahmednagar News: बिबट्याचा हल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shivani Tichkule

सचिन बनसोडे

Sangamner News: संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात असणाऱ्या वडदरा गावात उत्तम बाळाजी कुऱ्हाडे ( वय-६२ ) या व्यक्तीवर घरात घुसून बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. यात त्यांचा जागीच मृत्यूू झाला असून बिबट्याचा हल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पठारभागात बिबट्याचे मानव वस्तीवर येण्याचे प्रमाण वाढले आहे. बोटा-अकलापूर रोडवरील वडदरा येथे वास्तव्यास असलेले उत्तम कुऱ्हाडे घरात टीव्ही पाहत होते. घराचा दरवाजा उघडा असल्याने परिसरातच दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leoprad) काही कळायच्या आत त्यांच्यावर घरात घुसून हल्ला चढविला.

मानेचा घोट घेत त्यांना जागीच ठार केले. त्यांच्या आईने जोरजोरात आरडाओरड केल्याने मृतदेह टाकून बिबट्याने पळ काढला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. (Ahmednagar News)

घटनास्थळी पोहचून त्यांनी या घटनेची माहिती घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात (Hospital) पाठविण्यात आला आहे. बिबट्याचा वावर पूर्वी पासून आहे मात्र आता तो मोठ्या प्रमाणात वाढला असून बिबटे माणसांवरही हल्ले करु लागले असल्याने वनविभागाने गावोगावी पिंजरे लावावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धुळ्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु

Cobra Rescue : सरपटत गेला अन् बियरच्या कॅनमध्ये अडकला; विषारी सापाच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Accident News : घरी परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू

Road Accident Prediction Device: चालकाला डुलकी आली तरी नाही होणार दुर्घटना; ब्रेक लावून कारही थांबेल

Vivo V60e: जबरदस्त बॅटरी अन् दमदार फीचर्ससह Vivo V60e भारतात लाँच; किंमत किती?

SCROLL FOR NEXT