kolhapur ganesh visarjan saam tv
महाराष्ट्र

Ganeshotsav मंडळाच्या पदाधिका-यांसह ४० ते ५० जण पाेलीसांच्या रडारावर

Kolhapur Ganesh Visarjan : पाेलीसांच्या आदेशाचा भंग केल्याने गुन्हा दाखल

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Ganpati Visarjan : कोल्हापुरातील बुधवार पेठ तालमीच्या चाळीसहून अधिक कार्यकर्त्यांवर पाेलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. विनापरवाना गणेश विसर्जन मिरवणूक काढल्याने माजी महापौर दिगंबर फराकटे, साऊंड सिस्टिम मालकासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलीस ठाण्यातून मिळाली. (Maharashtra News)

अनंत चतुर्थीच्या (anant chaturdashi) दुसऱ्या दिवशी या मंडळाने गणेश विसर्जन मिरवणूक काढून शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण केला, विनापरवाना मिरवणूक काढली, पोलिसांशी हुज्जत घातली, आवाज मर्यादेचे उल्लंघन केले या कारणास्तव पाेलीसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांना (ganeshotsav) परवानगी देतानाच पोलिसांनी नियम व अटींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनंत चतुर्दशीलाच मंडळांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करणे आवश्यक होते. परंतु या गणेश मंडळाने आदेशाचे पालन केले नाही.

परिणामी मंडळाच्या पदाधिका-यांसह ट्रॅक्टर चालक, जनरेटरचे मालक, ध्वनियंत्रणेच्या मालकासह अनोळखी ४० ते ५० जणांवर लक्ष्मीपुरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: ऑनलाईन तक्रारी वेळेत न सोडवल्याने सोलापूर महापालिकेची 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई

Thyroid symptoms: थायरॉईडची समस्या असेल तर अचानक पायांमध्ये दिसतील ही ६ लक्षणं

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगारासोबत HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

SCROLL FOR NEXT