Gautami Patil Viral News Instagram
महाराष्ट्र

Gautami Patil News: 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर गौतमी पाटील अलर्ट! खबरदारीसाठी केली नवीन खरेदी; आता थेट...

Lavani Dancer Gautami Patil News: काही दिवसांपूर्वी गौतमीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली होती.

Gangappa Pujari

Gautami Patil Use Vanity Van: लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या विविध कारणांमुळे चांगलीच चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणीतरी लूपन हा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर गौतमी पाटीलने मोठी खबरदारी घेतली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, लावणी कलावंत गौतमी पाटील नेहमीच चर्चेत येत असते. संपूर्ण महाराष्ट्रभर गौतमीचे चाहते आहे. राज्यातील विविध भागांत अनेक कार्यक्रमानिमित्त तिचे डान्स शो आयोजित केले जातात. गौतमीच्या कार्यक्रमाला हजारो चाहते गर्दी करत असतात. अनेकदा तिच्या कार्यक्रमात तरुणांनी धुडगूस घातल्याचंही समोर आलं होतं.

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणीतरी लूपन हा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल (Viral Video) करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून गौतमी व्हॅनिटी व्हॅन वापरते.

सोबतच्या इतर कोणत्याही कलाकाराबाबत असा प्रकार घडू नये म्हणून गौतमीने व्हॅनिटी व्हॅन वापरण्यास सुरुवात केली आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असतात. शिवाय कलाकरांसाठी ही व्हॅन अत्यंत सुरक्षित असते. मराठी सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंतचे कलाकार या व्हॅनिटी व्हॅनचा वापर करतात.

त्यामुळे गौतमीनेही व्हॅनिटी व्हॅन वापरण्यास सुरुवात केली आहे. जिथे जिथे ती कार्यक्रमाला जाते तिथे ती व्हॅनिटी व्हॅनची मागणी करत असते. तसेच संरक्षणासाठी तिने बाऊन्सरही ठेवले आहेत.

याबद्दल बोलताना गौतमी पाटीलने सांगितले की, “व्हॅनिटी व्हॅनचं पाहिजे असं माझं काही नाही. मी आधी पडद्याच्या रुममध्येही कपडे बदलले आहेत. पण माझा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी काळजी घेते. म्हणून मी व्हॅनिटी व्हॅन वापरायला सुरुवात केली. त्यानंतर मी व्हॅनिटी व्हॅन असली पाहिजे, असं आयोजकांना सांगते. पण, जर व्हॅनिटी व्हॅन शक्य नसेल, तर चार भिंती असलेली व्यवस्थित रुम द्या, एवढंच माझं म्हणणं असतं.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT