Gautami Patil Saam TV
महाराष्ट्र

Gautami Patil Viral Video: 'तो' व्हायरल VIDEO आईने पाहिला अन्...; घटना सांगताना गौतमीला अश्रू अनावर

Clothing controversies : हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीचे कार्यक्रम आता बंद पडतील का? या घटनेमुळे ती खचून गेली

Ruchika Jadhav

Gautami Patil Viral Video: गौतमी पाटील सातत्याने चर्चेचा विषय बनत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या एका कार्यक्रमात कपडे बदलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. गौतमीच्या चाहत्यांने देखील या घटनेमुळे मोठा धक्का बसला. पुढे पोलिसांनी आणि राज्य माहिला आयोगाच्या अध्याक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी दखल घेतली. (Clothing controversies)

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीचे कार्यक्रम आता बंद पडतील का? या घटनेमुळे ती खचून गेली असावी अशी चर्चा देखील सुरू होती. मात्र या नंतर देखील गौतमी थांबली नाही. तिने तिचे कार्यम जसे आहेत तसेच सुरू ठेवले. आता गौतमीच्या कार्यक्रमांची गर्दी आधीपेक्षा जास्त प्रमाणात वाढलेली दिसते.

दरम्यान गौतमीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने याबाबत कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. अशात आता गौतमीची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे. गौतमीने यावेळी म्हटलं की, जेव्हा हा व्हिडिओ माझ्या समोर आला तेव्हा मी पूर्ण सुन्न झाले.

काय करावे आणि काय कारूनये हे मला सुचत नव्हते. त्यामुळे मी सर्वात आधी हा व्हिडिओ माझ्या आईला पाठवला. व्हिडिओ पाहून आईच्या मनाला देखील यातना झाल्या. बाहेर इतर कुणी आईला हा व्हिडिओ दाखवला असता तर तिला त्याने आणखी जास्त धक्का बसला असता. त्यामुळे मी स्वत:तिला हा व्हिडिओ दाखवला.

आई आणि मुलीमधील हा प्रसंग सांगताना गौतमीला अश्रू अनावर झाले होते. ती तिथेच रडू लागली. तसेच व्हिडिओ काढणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्या व्याक्तीला उद्देशून गौतमी पुढे म्हणाली की, त्या व्यक्तीला माझी प्रिसिद्धी पाहावली गेली नाही. त्याला मला बदनाम करायचे होते की माझे शो बंद पाडायचे होते याची मला कल्पना नाही. मात्र यामुळे मला मानसिकरीत्या मोठा त्रास सहन करावा लागला, असं गौतमी म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT