Latur  Saam tv
महाराष्ट्र

Latur : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांची भरली शाळा, काय संपूर्ण प्रकरण? वाचा

Latur latest News : लातूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांची शाळा भरलीये. वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण?

Vishal Gangurde

संदिप भोसले, साम टीव्ही

लातूरमध्ये चक्क शाळकरी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर शाळा भरवली आहे. लातूरच्या एकुर्गा येथील जिल्हा परिषद शाळेत आठवी वर्गाची मान्यता द्या, या मागणीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. एकुर्गा जिल्हा परिषद शाळात 8 वी वर्गाची मान्यता द्या, या मागणीसाठी १०० हून अधिक विद्यार्थ्यांना ठिय्या मांडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या एकुर्गा येथील जिल्हा परिषद शाळेत आठवी वर्गाची मान्यता द्या, या मागणीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळपासून लातूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर शाळा भरवत ठिय्या मांडलाय. मंगळवारी सकाळी 11 वाजता आलेले साधारण 150 विद्यार्थी रात्रीचे आठ वाजले तरीही दालनाबाहेरच ठिकाण बसले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

नियम काय सांगतो?

शाळेचा वर्ग वाढवण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा एक नियम आहे. जिल्हा परिषद शाळेच्या अंतरापासून तीन किलोमीटर अंतरावर जर वाढीव वर्ग नसेल, तर शासनाची मान्यता पुढील वर्गासाठी देण्यात येते. तसेच प्रत्येक वर्गात ३५ एवढी विद्यार्थ्यांची पटसंख्या असली पाहिजे, असा शासनाचा नियम आहे.

तब्बल ११ तासानंतर आठवीच्या वर्गाला मान्यता.

लातूरच्या एकुर्गा गावातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर दिवसभर शाळा भरवली होती. एकुर्गा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवी वर्गाची मान्यता द्यावी, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना समोर शाळा भरवली होती. ठिय्या आंदोलन देखील केले होते.

दरम्यान, या आंदोलनाची बातमी साम टीव्हीवर प्रसारित होताच रात्री उशिरा शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली. या शाळेला आठवी वर्गाची मान्यता दिली आहे. तर मागणी मान्य झाल्याने रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट; जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा|VIDEO

Maharashtra Live News Update: ठाकरे गट आणि मनसेच्या बैठकीत ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद

Apple Seeds: सफरचंदाच्या बिया खाल तर 'हा' होईल आजार, जाणून घ्या किती गंभीर असतो परिणाम

Chandrapur Crime : मित्राला खोट्या केसमध्ये अडकविण्याचा धमकी; मुलीला दुचाकीवरून बसवून नेत वनरक्षकाकडून अत्याचार

Mumbai News: निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल, मुंबईत रास्तारोको आंदोलन|VIDEO

SCROLL FOR NEXT