Latur Shocking Crime news Saam Tv News
महाराष्ट्र

लातूर हादरलं! मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Latur Shocking Crime news: 9 वर्षांच्या चिमुकलीवर ५० वर्षीय नराधमाने केला लैंगिक अत्याचार. लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घटना. पोलिसांत गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

लातूरमधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मेडिकल दुकानदाराने औषध खरेदी करण्यासाठी आलेल्या ९ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तसेच तपास करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या. सध्या पीडित मुलीवर रूग्णालयात उपचार सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दत्ता चिमन्नशेट्टे (वय वर्ष ५२)असे आरोपीचे नाव आहे. २ नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मेडिकलमध्ये गेली होती. मेडिकलमध्ये जाऊन तिनं मानदुखी बंद होण्यासाठी गोळी मागितली. आरोपीनं चिमुकलीला झाडून काढायचे आहे, असं सांगून मेडिकलच्या वरच्या खोलीत नेले. तसेच तिच्यावर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर आरोपीनं पीडितेला पंधरा रूपये दिले. पीडित मुलगी १५ रूपये घेऊन वडिलांकडे गेली. तसेच वडिलांना १५ रूपये दिले. वडिलांनी 'मी तुला ५ रूपये दिले होते, मग बाकी पैसे कुणी दिले?', असा सवाल उपस्थित केला. यावर पीडितेनं दत्ता मामाने दिले, असं सांगितले. तसेच वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

वडिलांनी थेट मेडिकल गाठले. तसेच आरोपीला जाब विचारला. 'मी कुठे काय केले?' असं आरोपी म्हणाला. नंतर मुलीनं आरोपीनं खोलीत अत्याचार केला असल्याचं सांगितलं. यानंतर वडिलांनी पोलीस ठाणे गाठले, तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आणि बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पुढील तपास पोलीस अधिकारी एन.व्ही हाश्मी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

SCROLL FOR NEXT