Latur, Rain, Schools, Holiday, Latur Rain Update  Saam Tv
महाराष्ट्र

Latur Rain : लातूर जिल्ह्यात दाेन दिवस शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

लातूर जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर (latur) जिल्ह्यात गेले दाेन तीन दिवस पावसाने (rain) दमदार हजेरी लावली आहे. आज (गुरुवार) सकाळी आठ वाजेपर्यंत गत 24 तासांत 38 मिली मीटर पावसाची नोंद झाली हाेती. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 345.9 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाने दाेन दिवस शाळांना (school) सुट्टी जाहीर केली आहे. (latur latest marathi news)

लातूर जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाकडून विविध स्तरावरील शासकीय यंत्रणा प्रामुख्याने महसूल,पोलीस, आरोग्य, पाटबंधारे विभाग हे सतर्क आहेत. एखादी आपत्ती कोसळली तर त्या घटनेस प्रतिसाद व तसेच पोलीस पंचनामा, प्रथमोपचार आदी घटनाक्रमाची रंगीत तालीम देखील प्रशासनाने नुकतीच जिल्हाधिकारी पृथ्वीराज. बी. पी यांच्या उपस्थित केली.

दरम्यान हवामान विभागाने लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभुमीवर प्रशासनाने शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशानूसार उद्या (शुक्रवार) आणि शनिवार (ता. 16) इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयासाठी सुट्टी राहील. दरम्यान शाळा, महाविद्यालयात शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे सुट्टी केवळ विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT