Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

latur News : वंचितच्या पराभूत उमेदवाराने घेतली अलिशान कार, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा; मुलाने दिलं स्पष्टीकरण

latur local political news : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठं अपयशाला समोरे जावं लागलं. वंचित बहुजन आघाडीच्या टक्केवारीतही मोठी पिछेहाट झाली. याचदरम्यान, वंचितच्या पराभूत उमेदवाराने कार घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

संदीप भोसले, साम टीव्ही प्रतिनिधी

लातूर : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठं अपयश आलं. निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार जिंकला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या मतदानाच्या टक्केवारीतही पिछेहाट झाली. दुसरीकडे लातूर लोकसभा निवडणुकीतही वंचितचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत उदगीरकर कुटुंबाने दोन अलिशान कार घेतल्या आहेत. यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीच्या नव्या कार खरेदीवरून लातूरमधील अपक्ष उमेदवार दिपक केदार यांनी टीका केली. या टीकेनंतर नर्सिंग उदगीरकर यांचा मुलगा योगेश उदगीरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पराभूत झालेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी एकाच दिवशी चार कोटी रुपयाच्या रेंज रोवर आणि फॉर्च्यूनर या २ अलिशान महागड्या कार बुक केल्या आहेत. याबाबत उदगीरकर यांच्या मुलाने आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकत माहिती दिली.

उदगीकर यांच्या मुलाने फेसबुक पोस्ट करत माहिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावरही लातूर लोकसभेचे अपक्ष उमेदवार दीपक केदार यांनी देखील टिप्पणी केली.

दीपक केदार काय म्हणाले?

दीपक केदार म्हणाले, लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची जोरदार चर्चा आहे. या उमेदवारने अलिशान कार घेतल्या आहेत. मी देखील या मतदारसंघात निवडणुकीला उभा होतो. निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवसांत इतक्या अलिशान गाड्या कुठून येतात. याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. या मतदारसंघात मी देखील उभा होता. आम्ही या मैदानात लढलो. पण विकलो गेलो नाही'.

दरम्यान, अलिशान कारवरून नर्सिंग उदगीरकर यांचा मुलगा योगेश उदगीरकर यांनी सांगितले की, आम्ही पाच भावंडे आहोत. सर्व कमावते आहोत. त्यामुळे वडिलांना परभावाच्या खच्चीकरणातून काढण्यासाठी हे गिफ्ट दिलं आहे, असं स्पष्टीकरण मुलाने दिलं.

दरम्यान, सोशल मीडियावर या कार खरेदीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उदगीरकर हे लोकसभा प्रचारात जास्त चर्चेत आलेच नाहीत, असा अनेकांचा आरोप आहे. त्यात निकाल लागल्यानंतर अगदी पंधरा दिवसात दोन अलिशान गाड्या घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT