latur news  Saam tv
महाराष्ट्र

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Latur Shocking : मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या तरुणाने लातुरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणाने आत्महत्येपूर्वी लाईव्ह येत कारण सांगितलं.

Saam Tv

संदिप भोसले, साम टीव्ही

लातूरच्या निलंगामध्ये एका तरुणाने छातीत सुरा खूपसून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणाने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर अकाऊंटवरून लाईव्ह येत आत्महत्येचं कारण सांगितलं. त्यानंतर या तरुणाने आयुष्य संपवलं. तरुणाच्या आत्महत्येने निलंगा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. येथील सुरज सागावे या 32 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर लाइव्हवर आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. सूरजने छातीत सुरा खूपसून जीवन संपवलं. लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान सूरजचा मृत्यू झाला.

सूरज हा मागच्या अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यस होता. मात्र आज सूरज आपल्या गावी आला आणि निलंगा शहरातील लांबोटकर पेट्रोल पंपाजवळ लाईव्ह करत आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. यावेळी लाईव्हमध्ये सूरजने आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या लोकांना शिक्षा व्हावी,अशी देखील मागणी केली आहे. त्याने आत्महत्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. या प्रकरणाचा निलंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

सूरज हा मुंबईत राहायला होता. तो शनिवारी 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास लांबोटकर पेट्रोल पंपाजवळ आंब्याच्या झाडाखाली बसला. त्यानंतर झाडाखाली बसलेल्या सूरजने सोशल मीडियावर लाईव्ह करत 'मी आत्महत्या करत आहे, असे सांगितले. लाईव्ह केल्यानंतर काही वेळाने छातीत सुरा खुपसला. त्याला नातेवाईकांनी फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सूरजने फोन बंद केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

Hair Wash Tips: पावसाळ्यात किती वेळा केस धुवावे?

SCROLL FOR NEXT